दत्ता भगत यांच्या “वाटा पळवाटा” या नाटकातील अतिशय प्रभावी Monologue | Best Audition Script In Marathi For Male 36

सतीशा, आर दादासायब सत्तेमागं धावले तवा येडा बावरा झाल्ता जीव मंग भंडारे बी गेला रुपवत्यानं बी तीच वाट धरली. गवई, खोब्रागडे न्हाइ गेले पन निवडनुकीची घाई झाली की पुन्हा सम्दे तिथंच. मुसळधार पावसानं गढी जागच्या जागी इरघळावं तसं झालं सम्द. सगळा चिखोल. सम्दी उमीदच खचली व्हती. पर ह्या नव्या पोरायचं करतुत पाह्यल आन जीवाला उभारी आली. पर हे बी त्याच वाटनं निघायलेत.

आरे जा सम्दे जा! हा काका बाबासायबाची आसली अवलाद हय. घ्या तुमीच हारतुरे. पडा पाया कोनाच्या पडायचं त. म्या न्हाइ झुकनार ! कोन हाय र तो मला पाचसे रुपये देनार? मंत्री? पालक मंत्री? कोन्हाचा, कोन्हाचा पालक ? मिळव तूच सरदारकी. हा पठ्ठया मोडल पन वाकणार न्हाई. खबरदार कोनी हात लावंल त ह्या मूर्तीला. तुह्यासारख्या खूनी मानसाची त सावली बी पडू नव्हो. शेवंताला मारलीस तू. एका रांडव पोरीचा जीव घेतलास तू. निघनिघ इथून हाट, दूर व्हय.

(हातवारे करताना काकांचा तोल जातो. सतीशकाकांना सावरण्याचा प्रयत्न करतो. हेमा घाईने पाणी आणते. काका दिवाणावर पाय लांब करतात. उजवा हात उंचावून सतीशच्या मस्तकापर्यंत अर्जुन स्तब्ध. सगळीच पात्रे फ्रीज. त्रिसरणाचे करुणस्वर पार्श्व भागातून ऐकू येऊ लागतात. काळोख होतो.)

Leave a Reply