दत्ता भगत यांच्या “वाटा पळवाटा” या नाटकातील अतिशय प्रभावी Monologue | Best Audition Script In Marathi For Male 36
वाटा पळवाटा ले. दत्ता भगत काका: सतीशा काळीज सूपा एवढं झाल्तं ह्या अर्जुन्याचं धाडस पाहून. हत्तीचं बळ संचरलं व्हत मह्या अंगात. म्हन्लं निघाला एक मर्द गडी. तुह्यासारखे वाया गेले. सिकून सवरून वाया गेले पर ह्यानं दावल्ती आशा. पर हॅट ! सतीशा, आर दादासायब सत्तेमागं धावले तवा येडा बावरा झाल्ता जीव मंग भंडारे बी गेला रुपवत्यानं बी तीच…