Character : Male | Age : २०-३० | Language : Marathi (praman)
हे बघ माझा एकच फंडा आहे …. डोक्याला ताप नाही करून घ्यायचा. लाईफ एन्जॉय करायचं ! बिनधास्त रे…
हे बघ आपण दोघं एकमेकांनबद्दल क्लियर आहोत ना… तेच पुरेसं आहे. उगाच आता आपण त्यात logic काढायला जाण्यापेक्षा मज्जा घे ना त्याची ! एकदम… relax … बोले तो एकदम चिल… काय ?
( मस्त मौला सारखं) हे बघ आपली फितरतच अशी आहे की आपण फिरकी घेणं सोडत नाही, आणि आईला पण ते माहितीये, पण माझी मॉम आहेच थोडीशी त्या serial मधली over protective मॉम . मग काय करणार त्यापेक्षा फिरकी घ्या लोकांची… मज्जा घ्या… ( सिक्रेट सांगितल्या सारखं ) एक सांगू हे असं लोकांना घडणाऱ्या गोष्टी सुद्धा घडवून सांगण्याची मज्जा काही वेगळीच आहे …