Marathi Monologue For Female | Audition Script 37

आपण आज comedy आणि intresting अशी मराठी audition script बघणार आहोत . ही script तुम्ही मराठी Audition practice आणि self test साठी पाठवू शकता. तुमच्या चांगल्या audition साठी चांगली script महत्वाची आहे. आधी सराव करा आणि मगच पाठवा.

थोडा डाएट हो जाए !

ए मेल्यांनो मरायचं असेल तर खाऊन मरा! डाएट करून मरू नका !! हे मीच सांगते. हो… मी दीपाली मिरचंदानी. आय हेट डाएट! मी माहेरची पक्की मराठी. दीपाली गोखले म्हणजे खात्यापित्या घरची. नाश्त्याला ऑम्लेट खाल्ले, तरी संडे दुपारला चिकनची मेजवानी हवी. रात्री जेवण नको म्हटले तरी पाणी-पुरी, भेळ पुरी आणि कुल्फी लागतेच की! उपासाच्या दिवशी तीनवेळा तरी खाणे पाहिजेच !अशा घरातून मी आल्ये ती मिहीर मिरचंदानीच्या घरी. कॉलेजात ‘जास्ती वडे’ खाण्याची कॉन्टेस्ट होती. या मिरू पठ्याने वीस वडे खाऊन नंबर पटकावला. तेव्हाच मला आवडला ! त्याच्या घरी गेल्ये-किचनची साईज आणि डबे पाहून ‘माझे लव्ह’ फिक्स झाले. त्याचा भाऊ निमेश तर बोलतोच-हम काले हो तो क्या हुआ, लेकीन खानेवाले है ! माझी सासूमां-एका बैठकीला चौदा पापड खाते बरे ! त्यापुढे माझी ममा दोन खाल्ल्यावरच पुरे… पुरे ज्यादा नको करत्ये!!

आमच्याकडचे रांगते पोर दुधाच्या बॉटलला शिवणार नाही, पण पापड-अच्चारवर तुटून पडेल!काय सांगू तुम्हांला-लग्न झाल्यावर माझे वांधेच व्हायचे. नाश्त्याला मेदुवडे केले आणि चार खाल्ले तरी मिहीर म्हणायचा काय दीपू…. इतने मेच विकेट गिरा! दस खावोगी तोच तू खरी हमारी बनी ऐसे समझेंगे! त्या दिवशी कसेबसे दहा खाल्ले पण नंतर ठरवलं की हमभी कुछ कम नहीं! आमच्याकडे कमी खाणाऱ्याला ‘उपाशी… बेच्चारा’ म्हटलं जाते.

आमचे फॅमिली डॉक्टर मनसुखानी हेही मनःपूर्वक खाणारे. व्हीजिटला आले… पेशंट तपासला की खाने-पिनेका प्रबंध आहे का म्हणून डायनिंग टेबलवरच बसणार! डाएट लिहून देताना सबकुछ खानेका ! अशी तळटीपही टाकतात. आमच्याकडचे ड्रायव्हर, कामवाली कध्धी पगारावरून काचकूच करते नही, भाभी रोज खाना-नाश्ता देवो! हम खुश रहेंगे! आता बोला!आम्हांला डाएट करणाऱ्यांबद्दल तीव्र रिस्पेक्ट आहे. ज्याला जमते त्यांनी बिनपाण्याचे… बिन मिठाचे उपास करावेत!

आम्ही पार्टी करायची असेल, बाहेर हॉटेलिंग करायचे असेल तर जोरात म्हणतो – थोडा डाएट हो जाए! बघा तुम्ही देखील ट्राय करा !

हा monologue ‘” मुली महिलांसाठी 75 नाट्यछटा” या राजीव जोशी यांच्या पुस्तकातील आहे. पुस्तक मनोरमा प्रकाशन यांचं आहे.

Leave a Reply