पु. ल. देशपांडे यांच्या “तुझे आहे तुझपाशी” या नाटकातील अतिशय प्रभावी स्वगत (monologue) | Best Audition Script In Marathi For Male and Female

“तुझे आहे तुझपाशी” (Tujhe Aahe Tujhpashi) हे पु. ल. देशपांडे यांनी लिहिलेले एक प्रसिद्ध मराठी नाटक आहे

पु. ल. देशपांडे यांच्या “तुझे आहे तुझपाशी” या नाटकातील अतिशय प्रभावी स्वगत (monologue) आहे.

मूळ नाटकामध्ये हा Monologue मुलीच्या तोंडी आहे पण आपण मुलगा किंवा मुलगी दोघांसाठी तो वापरू शकतो.

Monologue मधली भावना:

  • अंधश्रद्धा व कर्मकांड
  • समाजाच्या अपेक्षांचं ओझं
  • वैयक्तिक इच्छा विरुद्ध लादलेली भूमिका
  • “सोंगट्या”सारखं माणसाचं आयुष्य

अहो अनाथ मुलगा मी. आजवर जिथे अन्न मिळालं, वस्त्र मिळालं; तिथे वाढलो. आमच्या आचार्यांच्या आश्रमात वाढलो मी. आचार्यांनी प्रार्थना कर म्हटलं की प्रार्थना करायची, सुत कात म्हटलं की सूत काढायचं. रस्ते झाड म्हटलं की रस्ते झाडायचे. हे असं का? असं केल्याने काय होत? असं कधी विचारलं नाही मी. असं का? तुमच्या बुद्धिबळाने उत्तर दिलय आज. घोडा अडीच पाऊल चालतो, उंट तिरका चालतो, हत्ती सरळ चालतो. हे असे का चालतात त्यांनी विचारायचं नाही. सोंगट्या आहेत त्या. पाप आहे ते. आमच्या आश्रमातली प्रत्येक स्त्री आणि प्रत्येक पुरुष याच पापाच्या भीतीने भेदरलेल्या अवस्थेत वावरत असायचा. आचार्यांनी तर यादीच केली होती पापाची. कशा कशात पाप नाही आहे.

मला आठवतं मी प्राथमिक शाळेत असेल. एक सात–आठ वर्षाचा असेल. दुपारच्या जेवणाला माझ्या मित्रानी डब्यात कांद्याची भजी आणली होती. मला खूप आवडली. मी आमच्या आश्रमातल्या स्वयंपाकीन बाईकडे गेलो आणि सांगितलं त्यांना भजी करायला. तर त्यांनी चोरून मला कांद्याची भजी खायला घातली. कारण आमच्या आश्रमात हे चालत नसे. भजी, चिवडा हे असले पदार्थ वर्ज होते. का? तर तामसी आहार चालत नाही; तमो गुण वाढतो म्हणे. अहो मी शाळकरी मुलगा मला काय माहिती तमोगुण वैगेरे. दुसऱ्या दिवशी आश्रमातल्या मंडळींनी सांगितलं आचार्यांना मी भजी खाल्ली म्हणून. तीन दिवस. तीन दिवस अख्या आश्रमान मौन धरलं होतं. मला वाटत होतं आतून, हे लोक मला मारत का नाही. सगळे गप्प. उषाताई तुम्ही भाग्यवान आहात. तुम्हाला तुमच्या आई वडिलांचा मार तरी खायला मिळाला असेल पण मला भलतीच शिक्षा. दिवसानंतर गळ्यात पाटी लटकवून अख्या आश्रमात फिरवलं मला. मी प्रत्येकांकडे जाऊन सांगत होतो. काय तर, मी चोर आहे, मी भजी खाल्ली. अहो किती भयंकर अपराध. नाही का?

शाळेतली सगळी मुलं माझ्यासमोर खेळायची, नाचायची, गायची आणि मी म्हणत बसलो होतो. मरणम प्रकृती शरिरणम. एका लहान मुलाच्या तोंडी किती सुंदर वाटतं नाही हे तत्त्वज्ञान.

तुम्हाला वाटत असेल, हा कसा काय राहिला या आश्रमात? पण दुसरं काय करणार होतो मी. कोराटी कुंपणावर वाढते ना तसा वाढलो त्या आश्रमात मी. माझे बाबा तुरुंगातच वारले. आयुष्यभर देशासाठी कस्ता खाल्ल्या. आणि लोकांनीही मला तेच सांगितलं.“ तू क्रांतीकारकाचा मुलगा आहेस”. एका गवयाच्या पोरानं सुरात गायचं अशी जशी लोकांची अपेक्षा असते ना, तशी एका क्रांतिकारकाच्या मुलानं आयुष्यभर देशासाठी जगायचं आणि नंतर मरायचं. या लोकांच्या अपेक्षेला बांधलो गेलो मी. काय करू? तू क्रांतिकारकाचा मुलगा आहेस. तू आयुष्यभर देशासाठी जगायचं. तू लग्न करायचं नाही. तुला परवानगी नाही. संसार…छे…छे अरे संसार कसला? तू क्रांतिकारकाचा मुलगा आहेस.

उषाताई, उंटाची इच्छा असो वा नसो, त्यानं तिरकच चालायचं असतं.

Leave a Reply