( दिलेला मोनोलोग हा झी मराठी वरील सिरीयल “घेतला वसा टाकू नको” यामधील “अंबा” या पात्रासाठी दिला गेला होता )
Character : Female | Age (20-30) | Language: Gramin Marathi
( अंबा पारध्याची बायको )
अंबा :
का व धनी ? का माझी चेष्टा करताय व ? तुमी सोताचा ह्यो मऊसूद शेला माझा अंगावर टाकला, अन मला म्हणताय व्हय. शेला आभाळातन पडला म्हनून.
आवं म्याबी पारध्याची बायको हाय, माझी नजर बी तुमच्यासारखीच तेज हाय, अंधारात कोळसा बघनारी.
चेष्टा सोडा अन सांगा बरं, ह्यो शेला अंगावर नुसता घातला तर दिसतीया का नाय रानीवानी.
काय म्हणाला ? रानावानी !
अव तुमी पारधी, तुमास्नी रान अन वनच दिसणार, चला मी जाऊन येते, सावकाराच्या वाड्यावर महाशिवरात्रीची पूजा हाय, जाते, जायलाच पाहिजे ,नायतर मग हे सावकार लगेच कर्जाची गोष्ट करतात. तुम्हाला घालून पाडून बोलतात, ते मला सहन होत नाही.
धनी तुमी बी येताय का बरोबर, चला.
अन ह्यो शेला अंगावर घेतल्यावर तुमची अंबा दिसते की नाय रानी वानी ? …
For reference you can watch my monologue :