Marathi Script For Audition …Girlfriend Monologue – 20

Character : Female | Age (20-30) | Language: Praman Marathi

माझी काय अडचण आहे ?  माझी अडचण ही आहे की , तुझ्याबरोबर PUB  मध्ये जायचं असेल तर आधी SHORTS घाला, मग वन पीस घाला,  मग खाली ते HIGH HEELS घाला, मग एवढा सगळा लवाजमा घेऊन पब मध्ये जा, मग नाचा, मग नाचताना मी uncomfortable. ज्या कपड्यांमध्ये मी कम्फर्टेबल आहे असे कपडे मी घालून आल्यावर तुला ते down market वाटणार. का तर असे कपडे घालून पब मध्ये कोण येतं??

 आणि मला नाचायची एवढी इच्छा असेल ना, तर मी गणपतीत नाचीन, नाहीतर नवरात्रीत नाचीन, नाही तर कोणत्याही मैत्रिणीच्या लग्नात  नाचीन. पण माझ्या कम्फर्ट झोन नुसार. तुला तिकडे जायचं म्हटलं तर तुला डाऊन मार्केट वाटणार. 

नाही.. नाही…  रात्रभर मित्रांबरोबर दारू पिऊन वाचायला आवडतं, अरे पण मी तुझ्यासारखी रात्रभर बाहेर नाही ना राहू शकत, माझ्या घरात आई-बाबा असतात आणि सगळ्यात मुख्य म्हणजे ते माझी जेवणासाठी वाट बघत असतात.

 तुला वाटतं आम्ही असं गुलुगुलु बोलण्याने पाघळतो म्हणजे आम्ही येडे आणि तुला जितके आम्ही येडे  वाटतो ना तितके आम्ही नाही आहोत, जरा बाकीच्या गर्लफ्रेंड ला विचार त्यांचे किती नखरे असतात ते, बेबी आज ना आपण स्टारबक्स ला जाऊया, बेबी आज ना मला पिझ्झा खायचा आहे, आज ना मला सलमानचा फर्स्ट डे फर्स्ट शो बघायचाय, बेबी आज मला वाईन प्यायची आहे, बेबी आज मला टॉप घेऊन दे ना, किती दिवस झाले आपण गोव्याला नाही गेलो,  आणि माझी काय इच्छा असते माहिती आहे, फक्त तुझा एकदा स्वताहून फोन येन बस…

या monologue चा audition video reference साठी पाहा

Leave a Reply