Character : Female | Age (18-25) | Language: Gramin Marathi
मालती :
आई साहेब… आई साहेब… अहो तुम्ही कशाला ?… द्या… द्या ती बादली हिकडं. मी घालते कपडे वाळत… तुम्ही जा आराम करा. गुडघे दुखतायत ना तुमचे? चला मी मालीश करून देते…
आता हाय का ? नाही लोकं म्हणत्यात, आई बापाची सेवा केली की लई पुण्य मिळतंय. पन सासू पन आई पेक्षा कमी आस्ती व्हय ? या गरीब मुलीच्या झोळीत बी पडू दे कि जरास पुण्य .. आता काय लाजवता का गरिबाला ? अहो तुमचं श्रीमंत नामदार घरानं, माझ्यासारख्या गरीब घरातून आलेल्या पोरीला तुम्ही स्वीकारलं, लई उपकार हाय तुमचे माझ्यावर. उपकार फेडायचे म्हणलं तरी फिटायचे नाहीत. म्हणून जमल तेवढी राबते या घरासाठी…
हो तुम्ही चला मी आलेच… ( आणि आता चेहऱ्यावरचे भाव बदलतात स्वतःशीच ) काय की बाई मालती … कायच्या काय कौतुक आहे तुझ्या सासऱ्यांना तुझं…. आदर्श सून वगैरे म्हने … ( कुत्सिक हसते) आदर्श ? शेळीच्या मागं लपलेला लांडगिनीचा चेहरा माहित नाही ह्यांना… लबाडी रक्तात आहे माझ्या . आज सगळ्यांसमोर वाकून रहातेय , एक दिवस जेव्हा सगळ्यांना वाकवीन…
जो प्रेमानं कवेत येईल त्याला प्रेमानं कवेत घेईन जो कपटान येईल त्याला कपटानं…