Marathi Audition Script (Monologue) For Male… मराठी मोनोलॉग स्क्रिप्ट ऑडिशनसाठी -5

Character : Male | Age : 24 to 30 | Language : Marathi

( चाळीतील पोरगा  तो एका कॉर्पोरेट कंपनीमध्ये कामाला आहे )

चला काका वर्गणी काढा…  अहो कसली म्हणजे काय ? गणपतीची…  सालाबाद प्रमाणे यंदाही आपल्या चाळीत गणपतीचे आगमन होणार आहे.  त्याची वर्गणी काढा, चल रे नाव लिही…  वारलेले …म्हणजे वामन रमाकांत लेले. काका आकडा कितीचा टाकू म्हणजे 151 की 251…  अहो आता मोदक न मिळालेल्या लहान पोरासारखं तोंड करू नका, गव्हर्मेंट मध्ये जॉब करता तुम्ही आणि काकी पण घरी ट्युशन घेतात एक ते चौथीच्या, एकेका विषयाचे दोनशे रुपये घेतात त्या, गप्पपणे 151 द्या… 

( त्याचा फोन  वाजतो ) एक मिनिट हा काका,  बॉस चा फोन आहे… Please don’t disturb me… hello sir,Yes I talk with that client but he was not interested in our current deal,  I think we have to rethink on our strategy sir.. yes sir, Definitely.. I give my report on Tuesday.. ok sir. bye.. have a nice day…

( फोन ठेवत )काय काका असे काय बघताय ? वर्गणी मागायला तुमच्या दारात उभा आहे म्हणजे हा  पण एक वाया गेलेला पोरगा आहे असंच वाटत होतं ना तुम्हाला ? पण लक्षात ठेवा,  दिसतं तसं नसतं म्हणूनच जग फसत, गणपती बाप्पा मोरया …

Leave a Reply