Marathi Audition Script (Monologue) For Male… मराठी मोनोलॉग स्क्रिप्ट ऑडिशनसाठी 33 – Shital Raut

हा monologue ‘ मोरया ‘ या मराठी चित्रपटातला आहे.चाळीतील मुलं जेव्हा गणपतीसाठी वर्गणी मागायला जातात तेव्हा एक घरातली वाहिनी त्यांना उलट सुलट बोलते, त्यात ती पोरांना “उपटसुंभ कुठले” असं म्हणते. त्यावर त्यांचा लीडर ज्याची भूमिका संतोष जुवेकर या actor नि केली आहे .तो त्या वहिनीला चिडून बोलतो . त्याच्या तोंडी असलेले हे dialogue.

Character : Male | Age : 18-30 | Language : Marathi  

काय बोलला तुम्ही पोरांना ? उपटसुंभ !
वहिनी सकाळी ६ वाजता कामावर जातात ही, संध्याकाळी ४ वाजता घरी न जाता, डायरेक्ट मंडपात येतात, मंडपाची कामं करतात, रात्रभर decoratiion ची कामं करतात, सकाळी ६ वाजता परत कामावर जातात…उपटसुंभ ?

वहिनी तुमच्या पोरांची तुम्ही जेवढ्या आतुरतेने वाट बघताना संध्याकाळी शाळेतून येताना,तेवढीच ,त्याच्यापेक्षा जास्त आम्ही आमच्या गणपतीची दरवर्षी वाट बघतो. तुम्ही तुमच्या नवऱ्याला जितक्या प्रेमाने घास भरवला नसेल ना, त्याच्यापेक्षा जास्त प्रेमाने आम्ही आमच्या गणपतीच्या समोर प्रसाद चढवतो. तुमच्या लग्नात तुमचा बाप तुम्हाला सासरी पाठवताना रडला नसेलना त्याच्यापेक्षा जास्त आम्ही रडतो आमच्या गणपती विसर्जनाच्या दिवशी …. उपटसुंभ.
५० रुपये वर्गणी देता आणि त्याची आम्ही दारू पितो असं म्हणता… क्वार्टर चे rate तरी माहिती आहेत का ? (घोरपडे ला उद्देशून ) घोरपडे, गणपतीच्या १० दिवसात १ तरी मुलगा प्यायलेला दाखवा . घोरपडे, तुमच्या ढेंगे खालून जाईल…

जाऊदे..आयला ..तुमच्याशी बोलण्यात काय.. तुम्हाला काय पडलीय गणपतीची..गणपती आला काय आणि गेला काय .. फक्त ढुंगणाला पाय लावून पळत या आरतीचा मान घ्यायला. च्या आयच्या हे घ्या तुमचे १०० रुपये.तुमच्या १०० रुपयाची भीक नाही लागली आमच्या गणपतीला … आणि हि पोरं आहेत ना वर्गणी मागायला येतात, भीक मागायला नाही येत तुमच्या दारात. ..

एकच सांगतो घोरपडे… आज पासून चाळीच्या गणपतीशी तुमचा सम्बन्ध संपला…
मंडपाच्या आसपास जरी दिसलात ना… आयचा घो घोरपडे तंगड्या तोडून गळ्यात बांधेन

Leave a Reply