Marathi Audition Script For Female… Marathi Monologue-18

Character : Female | Age (20-35) | Language: Praman Marathi

सौदामिनी: 

(फोन वर )

ठीक आहे…  ठीक आहे…  ह्या पलीकडे तुझ्याकडून फार वेगळ्या उत्तराची अपेक्षा नव्हतीच मला.  लोकांचे जग बायको भोवती असतं..  तुझ्या बाबतीत ते  तुझी आई,  तुझी बहीण, तुझा भाऊ, तुझी वहिनी, त्यांची मुलं या भोवती फिरत…  चल मला खूप काम आहेत, तेच तेच बोलण्यात काही अर्थ नाहीये, मी फोन ठेवते…  नाहीये…  आपल्यात  तसं काहीच  उरलेलं नाहीये आणि तुझी जर अशी अपेक्षा असेल  कि मी बदलावं तर ते कदापि शक्य नाही…  मी सौदामिनी परांजपे आहे, मी कधीच चुकत नाही, आणि कोणताही निर्णय घेण्याआधी मी दहा वेळा तपासून बघते…  माझा निर्णय पक्का आहे. 

                       ए  हॅलो…  मी तुला विचारायला फोन केलाच नव्हता किंवा तुला बोलू द्यायला फोन केलाच नव्हता…  मी तुला सांगायला फोन केला होता.  माझं सांगून झाल आहे, मी फोन ठेवते… ( phone cut करते )

 किती निर्लज्ज माणूस आहे हा.  मी स्त्री आहे म्हणून मी नमतं  घ्यायचं, माय फूट…  मला काय माझं करियर नाही…  त्याला काय वाटतंय माझ्यात एकटे रहायची गटस  नाहीत ? 

  आणि हा माणूस काय मला खुश ठेवणार?  साधी साडी घ्यायची बायकोला तर सगळ्या गावाला विचारणार, कशी घेऊ ?  किती बजेटची घेऊ ? रंग कोणता घेऊ ?  अरे स्वतःची अक्कल नाही का ?  मग लग्न कशाला केलं ? माझं नशीब चांगलं म्हणून मी मूल होऊ न देण्याचा निर्णय त्यांच्यावर लादू शकले.  नाही तर त्या म्हातारीला,  लगेच पहिल्या वर्षात नातू खेळवायचा होता मांडीवर. 

 मूल मला ही  हवं होतं, पण त्याच्यासाठी तसच शांत, आनंदी वातावरण हवं ना घरात…  आधी घरात आहे त्या माणसांचे  सूर जुळायला हवे, मग पुढचा विचार करता येईल… ( कॉल येतो ) काय निर्लज्ज माणूस आहे खरंच…  दहा वेळा फोन कट करून सुद्धा… शी …. (फोन स्विच ऑफ करते )

या monologue चा audition video reference साठी पाहा..

Leave a Reply