Character: Female(Negative) | Age(23-33) | Language: Marathi (Varhadi dialect )

Script:1
सुवर्णा:
खरंच कलियुग आलाय रे बाप्पा ,डोक्सीच फिरलीय साऱ्यायची,पोरीच लगन लावाचं सोडून तिले पाटी आनुन देतायत आमचे भाऊजी. मले त वाटते त्या सावकाराकडं जमीन नाई, अक्कल गहाण टाकली ह्यांनी .साळत शिकून करणार काय हि चिंधी ? उष्टी खरकटीच काढन न सासरी जाऊन ? माय त डोक्सच फिरते ते समोर आली का. लई शानी समजते स्वताले, पण आमच्या पार्वतीची सर हाये का तिले ? माया पार्वतीच्या हातची भाकरी खाऊनपा एक डाव. मंग समजन, किती सुगरन हाय. साळत नाई गेली मनून शिकली सारं नाईत गेली असती वाया त्या चिंधी सारखी.
Script :2
सिंधुताई:
साहेब उगा सरकारले त्रास दयाले न्हाई आलो आम्ही इथं. आम्ही या गावचं गावकरी हाय, या रानात गुरं शेकरं चाराले नेतो. आन आज नाई वो, आमच्या पिढ्यान पिढ्या याच रानात गुरं शेकरं चारतात. आमच्या रोजी रोटीचा आधार हाय वो तो. आज तो संपत शेट आम्हाले सांगून रायला, या रानावर म्हणं सरकारी अधिकार हाय, आम्हा समदयाले आमची गुरं शेकरं चाराले नेता येणार नाई. आव लेकरं वासरांनी खावं काय ? साहेब जन्मदाता पोट देतो ते भरायची व्यवस्था बी त्योच करतोय बाप्पा.आन कायद्याचं म्हणान तर माणसाच्या, जनावरांच्या भल्यासाठीच हाय कायदा. सुखी आयुष्यासाठीच हाय का नाई कायदा. कायद्यासाठी माणसं आन जनावर नाई.तवा आम्हाले रानात गुरं वासरं चारायची परवानगी द्यावी, लाकूडफाटा, जनावरांच शान काय असत ते उचलून न्हायची परवानगी द्यावी.एवढंच नाई तर सरकार तुम्ही आम्हाले एक पर्यायी व्यवस्था करून द्यावी, एवढी इनंती हाय सरकार मायबाप. आन त्या शिवाय आम्ही समदी काय इथून हालायची नाई.