Character: Male (Comic) | Age(35-60) | Language: Marathi (Praman)
नमस्कार… मी दीपक शांताराम. हे इथून जवळच सात आठ मिनिट लागतात माझ्या घरी पोहचायला.
अहा..हा..हा..हा घरी बायको आणि दोन मुलं .त्यांना पोसण्यासाठी मार्केटिंग करतो मी, Door To Door… Door To Door… Door To door … कुठल्यातरी फालतू कंपनीच प्रॉडक्ट आमची कंपनी विकत घेते… आणि मी ते प्रॉडक्ट घरोघरी जाऊन विकत असतो… Door To Door… Door To Door… Door To Door …
संध्याकाळी बॉस ची कटकट, घरी आलो कि बायकोची कटकट… कटकट… कटकट… कटक… कट…कट… कट…
सहनशील….(smile)…
माहिती आहे… माहिती आहे ,सहन करण्याची ताकद कोण देतो… हे….. गांधीजींच्या तीन माकडातलं एक माकड …(smile)
बॉस आणि बायको असे समोर आले ना तर ते गांधीजींच्या माकडातलं ” बुरा मत सुनो ” वाला माकड माझ्या अंगात घुसतं आणि मी (कानावर हात ठेवतो)