( दिलेला मोनोलोग हा झी मराठी वरील सिरीयल “घेतला वसा टाकू नको” यामधील “ सावकारीण ” या पात्रासाठी दिला गेला होता )
Character : Female | Age (20-30) | Language: Gramin Marathi
सावकारीण :
( रागाने ) मी सावकारीण, म्हणलं तर गावाची राणी, म्हणजे मी करायचं अन गावानं बघायचं, मी बोलायचं अन गावानं ऐकायचं, आजवर करेन ते कारण, अन बांधेन ते तोरण असा माझा रुबाब, पण त्या नटवीनं येऊन साऱ्या रंगाचा बेरंग केला.
म्हणजे पूजा माझ्या दारात, पूजेला गावातल्या बायकांनी यायचं, माझं कौतुक करायचं, मी नेसलेल्या चंद्रकलेची वा वा करायची, माझ्या ठिपक्याच्या चोळीकडे टकामका बघायचं, माझाच तोरा दिवसभर, पण ती नटवी आली नेमकी बोलावल्यासारखी तो ही शेला मिरवत.
नेमका आजच मुहूर्त मिळाला अन कसलं काय माझ्याकडे बघणाऱ्या बायका तिला बघू लागल्या. माझं कौतुक करायचं सोडून तिच्या कौतुकात दंग, बघितलं तर पारध्याची बायको पण… कैदाशीण मेली… आता हे बघा, मी आता पूजेला बसणार नाही, मी चालले माहेरी…
For reference you can watch this monologue: