Character : Male | Age : 18 to 23 | Language : Gramin Marathi
पात्रा विषयी: मित्राला मदत करणारा एक कॉलेजला जाणारा मुलगा
वशा:
थांब, चांगला रोमान्स कुलर डायलॉग सांगतो…
तुझे सरपिले केस, चमकीले काळे… घुबडासारखे वटा वटा डोळे, गाल तुझे तंबाटे, कारले आणि दोडके… तू माझी मेंढी, मी तुझा एडका… सकु, एरंडाच्या पानासारखे तुझे नाजुक कान… सकु, तू अवकाळी पावसासारखी हाईस… मातीचा सुवास अन हरभऱ्याचा सत्यानास … सकु, तु मध्यवर्ती बँकेतल्या चेका सारखी हाईस. भेटतही नाही अन वटतही नाही…. तू सरकारची सबसीडी हाईस ,धन्याला धतुरा अन चोराला मलिदा… ओके थँक यु मिस यु…
बजा अय बजा… कुठे गेला ? मेंडी कडं गेला का काय ?