( ही ऑडिशन स्क्रिप्ट सहकुटुंब सहपरिवार या मराठी मालिकेच्या ऑडिशन साठी दिली गेली होती )
Character : Male | Age : 20 to 27 | Language :Marathi
काय आणलेत…? पेढे ? द्या दहा किलो द्या… कसले देऊ काय कसले ? पेढे द्यायला आलाय ना, मंग कंदी काय ? म्हणलं काय ? साखरेचा काय ?… पेढा तो पेढाच… द्या आणि देऊन जा. दादा आला की बिल पाठवून देतो.
नेहमी किती देता माहिते ना, मग तेच तेच का विचारताय आप्पा ? काय आहे, अशाने एक तर वेळ जातो एकमेकांचा, आणि हातातलं काम सोडून त्यात डोकं गुतल की मनात तोच विचार घोळत राहतो. मग तुम्ही माझ्या बद्दल विचार करणार , मी तुमचा विचार करणार , आणि मग ध्येयापासून लांब पळतो आपण…
हा ठेवा तिथं… किती ? पाच पिशव्या… मी देतो बिल पाठवून आणि कोणी आलं नाही तरी मी येऊन जाईन. काय म्हणाला? काय आणलय नवीन ? नाही नाही… नको…. बरं, आईला विचारून सांगतो आणि कळवतो आप्पा … बर. या.. या…
मंदिरात आहे मी तुझ्या चरणी ठेवतो माथा | तुझ्या अवताराची गाईन मी गाथा ||
आई सप्तशृंगी तुझा महिमा वर्णू मी काय | तुझे नामस्मरण करण दिन रात जाय ||
काय करू दादा ? बरं बरं मी घरी जाऊन जेवून येतो. लगेच जाऊन लगेच येतो. तू थांबतोय ना दुकानात ? बरंयेतो आईला सांगून, घेऊन येतो…