Marathi Negative Audition Script For Female | 2 Marathi Monologue- 31

Script 1:

माणसाचं आयुष्य हे photo frame च्या चौकटीसारखं असतं .
चौकटीच्या एका कोपऱ्यात माझा नवरा .प्रेमळ सुस्वभावी ,माणूस म्हणून ग्रेट , पण पुरुष म्हणून ?
मन, प्रेम, भावना हे सगळं काही ठीक आहे हो ,पण प्रेमाने शरीराची भूक नाही भागवता येत. म्हणून मग मी चौकटीचं दुसरं टोक निवडलं गौरव नावाचं. ते फक्त गरजेपुरतं .ते गरज म्हणून ठीक होत पण तो आता माझ्या मनावर माझ्या शरीरावर अधिराज्य गाजवू लागला आहे आणि ते मला मान्य नाही.
माझ्या मनावर, माझ्यावर कोणीही राज्य करू शकत नाही .

मी आजपर्यँत बुद्धिबळातल्या वजिरासारखं जगले. कारण संपूर्ण खेळात बादशहाला राजाची भीती नसते, वजिराची असते. आमच्या मामांजींना; रावसाहेब सुभेदारांना हि होती म्हणूनच त्यांनी मरतांना विल च अशी बनवली कि मी, असून नसल्यासारखे.
मग मी ठरवलं… फ्रेम च्या तिसऱ्या टोकाचा वापर करायचा. नेहाचा. आणि म्हणूनच आज ती इथे नाहीये.
सॉरी नेहा…

Script 2:

(फोटो हातात घेते आणि बघते)
बाई बाई बाई…. हा फोटो फ्रेम करून आलाय ! अरे देवा ! अरे मूर्ख माणसा काही अक्कल आहे कि नाही तुला? मी हा फोटो कशासाठी दिला होता तूला ? दहीहंडीच्या दिवशी मालकाला श्रद्धांजली वाहायची आहे म्हणून ना ? मग त्यांचा काढलेला फोटो सोडून तू याची फ्रेम बनवलीस!

आता ना डोक्यात गेला आहेस तू माझ्या.काय बोललास फ्रेम चांगली बनली आहे? अरे तू सोन्याची फ्रेम लावशील पण मालकाचा फोटो सोडून माझ्या वहिनीचा फोटो लावलास.

काय वाटत असेल माझ्या भावाला हा फोटो पाहून? काळीज तुटत असेल बिचाऱ्याचं , आणि हे सगळं तुझ्या बावळटपणामुळे झालंय. असा कसा फोटो बदलू शकतोस तू? ते काही नाही. आत्ताच्या आत्ता हा फोटो बदलून आण नाहीतर जीव घेईन मी तुझा. चल जा…

( इकडे तिकडे बघते) आणि तुम्ही काय बघताय ? जा आता… जा …काही टेन्शन घेऊ नका, माझी वहिनी अजून देवा घरी गेलेली नाही. जा….

(एक्सप्रेशन चेंज) (हसते) कशी वाटली माझी आयडिया ? खेळ अजून संपलेला नाही. वहिनी… हा फोटो चुकून लागला होता, पण पुढच्या वेळी खरा फोटो लागेल

Leave a Reply