5 Best Marathi Audition Script For Female – Marathi Monologue


बाबा तुम्ही म्हणताय ते मला सुद्धा पटतय.. पण तुम्ही हे नका न विसरू कि स्वामी कधीच आपल्याला कोणता वाईट सल्ला देणार नाहीत. हो माहिती आहे त्यांनी तुम्हाला हे पैसे मडक्यात टाकून ते पुरायला संगीतल पण त्या मागे काहीतरी कारण असेल न? उगाच नाही ते या बद्दल काही सांगणार.. त्या मागे स्वामींचीच काही लीला असेल तर? तुमच्या हे का नाही लक्षात आहे? मला हि मान्य आहे कि माझ्या लग्नासाठी तुम्ही हे पैसे कष्ट करून जमवले. पण तुम्ही स्वामींची आज्ञा मोडून हे पैसे कोणत्या तरी भलत्याच्या हाती देताय. अशा एका माणसाच्या हाती ज्याचा व्यवहार आम्हाला कधीच बरोबर नाही वाटला. उद्या काही भलतच सलत झाल तर त्याला कोण जबाबदार.? माझ ऐका बाबा माझ तर प्रामाणिक मत आहे कि तुम्ही स्वामींनी दिलेलाच मार्ग वापरा.. |

जानकी वय 30/35
(जानकी ही गावातील स्त्री आहे तिने नऊवारी नेसलेली असावी आणि script मधला काळ हा संतांचा आहे हे लक्षात घेऊन पात्र साकारण्याचा प्रयत्न करावा)

स्वामी महाराज काय चुकल मुकल तर माफ करा.. काय आता आमच्या यांचा स्वभाव आहेच तसा.. तुम्ही मार्ग दाखवला बरोबर आहे. पण एवढी मोठी रक्कम अंगणात पुरायची म्हणजे.. एका बाजून मला यांच पण पटतय आणि दुसऱ्या बाजूने तुमची आज्ञा टाळण चुकीच वाटतय. तुम्ही सांगताय ते आमच्या भल्या साठीच सांगताय हे कळत मला. पण यांना कोण सांगणार.. साध भोळा नवरा आहे हो माझा.. माझ्या एवढीच त्या पेक्षा जास्त त्यांची भक्ती आहे तुमच्यावर. खूप मानतात तुम्हाला. पण एवढ काबाड कष्ट करून मिळवलेली रक्कम अस… माफ करा स्वामी महाराज.. यांच्या शब्दा पुढे मला हि जाता येत नाही. पण याचं काही चुकल तर खर्च आम्हाला सांभाळून घ्या.

यशवंत आई वय 55/60
( यशवंताची आई गावातील स्त्री आहे तिने नऊवारी नेसलेली असावी आणि script मधला काळ हा संतांचा आहे हे लक्षात घेऊन पात्र साकारण्याचा प्रयत्न करावा)


देवा देवा देवा देवा… आता सहन नाही होत रे हा त्रास. देवा मुक्त कर रे बाबा या सगळ्यातन मला. फक्त एकदा मला माझ्या मुलाच नातीच माझ्या सूनेच तोंड बघू दे.. दोन शब्द त्यांच्याशी बोलू.. मग मी हसत हसत डोळ मिटायला मोकळी. नाही सहन होत रे माझ्याच्यान आता हे सगळ. थकले मी.. यशवंता पोरा लवकर ये.. आता फक्त वाटकड बघत बसण्या पलिकड मझ्याकड काहीच उरल नाही.. लवकर ये रे पोरा लवकर ये..

अनुसया पाटील वय ३० वर्ष

(शांत, प्रेमळ, मनमिळावू, सुशील, सद्गुनी सुंदर, सालस, गरोदर राहू शकत नसल्यामुळे सासू कडून आणि समाजाकडून सतत बोलणे ऐकायला लागणे सासूचा छळ सहन करणे पण पतीचे असणारे प्रेम यामुळे सारे काही काहीही न बोलता सहन करत राहणारी)
खर सांगू का कधी कधी खूप त्रास होतो हो या सगळ्याचा. वाटत त्या देवाने माझ्याच पदरी का अस दुख दिल असाव. मी कुणाच अस काय वाईट केलय ? कि त्याची हि शिक्षा मला देतोय. माझी हि इच्छा आहे मला हि खूप वाटत. जेव्हा इतरांची लहान मूल बघते तेव्हा माझ्यातली हि आईपणाची भावना जागृत होते. पण काय करू माझी तरी काय चुकी आहे हो यात? तुम्हीच सांगा? प्रयत्न केले कित्तेक वेळा प्रयत्न केले. नाही शक्य झाल पण या सगळ्याला सासूबाई मलाच दोषी धरत आहेत. प्रत्येक वेळी मलाच टोचून टोचून बोलत आहेत. खरच कंटाळा आलाय हो या सगळ्याचा नाही सहन होत आता. मी तर म्हणते करा त्यांची इच्छा तुम्ही पूर्ण मी नाही अडवणार तुम्हाला? मग काय बोलू जितक तुमच प्रेम माझ्यावर आहे तितकच माझ प्रेम देखील तुमच्यावर आहे. पण आत्ता जी परिस्थिती आपल्यावर ओढावली आहे. त्याला दुसरा पर्याय तरी काय आहे? मी नाही पाहू शकत तुम्हाला दुसऱ्या कोण सोबत पण..
(ती रडायला लागते)

अगालक्ष्मी:
( Script मधला काळ हा पौराणिक आहे त्यामुळें भाषेकडे, उच्चाराकडे लक्ष द्यावे)


ती :- पती सेवा हीच खरी ईश्वर सेवा आहे ! माझा जन्म हि त्याच कार्या साठी झाला आहे ! जिकडे पती चे चरण जातात ती माती मी माझ्या लल्लाटी लावते ! ते श्री राम आहेत मी सीता आहे ! ते चंदन आहेत मी सहाण आहे ! माझा श्वास चालतो ते त्यांच्या नामा नि ! माझे नयन उघडतात ते त्यांच्या स्मरणा नि ! त्यांना ठेच लागली कि माझ्या पायातून रक्त येत ! ते शतायुषी व्हावेत म्हणून मी अनंता च व्रत करणार आहे ! आणि श्री कृष्णा ला साकड घालणार आहे ! माझ्या पतिना अमरावती [ सोन्याच शहर लाभू देत ! माझ्या पतिना माझ आयुष्य लाभू देत

Leave a Reply