मित्रांनो या ब्लॉग मधे आपण मी लिहिलेल्या काही मराठी कविता ऐकणार आहोत .
या website वर आपण माझ्या मराठी poem , माझे विचार , acting संदर्भात माहिती, नाटकांचे review वाचत असता .आजचा हा माझ्या कवितांचा पहिला भाग. या भागात आपण 5 कविता ऐकणार आहोत.

1. तुझ्या बोलण्याची तऱ्हा
तुझ्या बोलण्याची तऱ्हा,
जणू नकळत बदलणारा मोसम
तुझ्या बोलण्याची तऱ्हा,
जणू कडकडणारी वीज अन
खळखळ वाहणारा झरा
तुझ्या बोलण्याची तऱ्हा,
वेड लावते मला;
भांबावते मनाला
तुझ्या बोलण्याची तऱ्हा,
चिमणा-चिमणीच्या गुजबुजण्यातली मजा
तुझ्या बोलण्याची तऱ्हा
मुग्ध असतो तो तेव्हा मिळते हृदयाला सजा
तुझ्या बोलण्याची तऱ्हा,
मुग्ध करते मला अन आतुर करते हृदयाला
तुझ्या बोलण्याची तऱ्हा…
2. प्रेम देशील का ?
प्रीत साजेशी जशी
प्रेम या अक्षराला
पुष्प जसे मोहरून
सुखावते फुलपाखराला
तसल्यागत माझे हृदय
साद घालते तुजला
मृगधारांची ओढ जशी
लागते लांडोराला
तसलीच ओढ माझ्या
लागली नयनाला
काय सांगू व्यथा
तुझिया मनाला
भेटशीलना मला त्या
आयुष्यातील वळणाला
वाट पाहीन मी तुझी
त्या प्रत्येक क्षणाला
स्विकारशीलना माझ्या त्या
निस्वार्थ प्रेमाला
पुसशीलना ओघळणाऱ्या
नयनातील आसवाला
प्रेम देशीलना मला …
3.वाट
दूर सुन्या महफिलीत
होती ती वाट पाहत
होता तिथे आवाजाचा गोंगाट
पण ती मात्र एकटीच मुग्ध
होती ती आपल्या कुसुमप्रियाची
आजीवन वाट पाहत
मिटेल काळोख होईल पहाट
येईल तो माझ्या हृदयातील श्वास
भरेल रंग महफिलीत
आज उद्या कधी तरी करीत
महफिल रंगली नाही
नाही आला तो नजरांच्या क्षितिजात
केले प्राण प्रियेने स्वतःला अर्पण
लोटला श्वासांचा ओढा तिमिरात
4.तुझ्या विरहात
माझं विरहशंकित हृदय
तुझ्या विरहाने कोंबलं
सांग कसं समजाऊ त्याला
आसवांच समुद्र दाटलं
तुझ्या परतीची वाट पहाता
नच कुसूमेही कोमेजली
तुझ्या नजरेची ओढ लागता
माझी नयनेही आसुसली
येतो पवन कोठून
तुझी आठवण घेऊन
पण का येत नाही तो
तुला संगे घेऊन
या सरितेच्या खळखळाटात
तुझ्या आवाजाचा गोंगाट
तिज बरोबर आहे का ?
माझ्या हुंदक्याचा सरलोट
संपेल विरह होईल
ग्रीष्माची पहाट
होईल का त्या पहाटे
तुझी नि माझी गोड भेट
5.स्वप्न
पाहिले जेव्हा नेत्र गात्रात तुझ्या
स्वप्न खरे वाटून गेले
जणु नभात तारकांनी
रत्नजडे विखरून गेले
मातीच्या सुगंधाने त्या
श्वास जसे मोहरून गेले
मृगधारांचे सागराशी
मिलन जसे होऊन गेले
मन माझे हे आतुरलेले
बाहुपाशात तुझ्या अडकून गेले
मोहरलेल्या आम्रपालीगत
स्वप्न तसे रंगून गेले..
just read poems written by me ..give me feedback
Tank you..
very nice and amazing line sister can i record it and post in my social media account……?
kharch khup bhari lihilas tai tu manatle taar ekdm ghanisht julale.
hay Harsh thank you so much .. you can record it and tag me on my instagram @iamshitalraut, you can visit my youtube as @actorshital and @shitalraut for more poetry and other videos
thank you