नटसम्राट हे वि. वा. शिरवाडकर यांनी लिहिलेलं नाटक आहे .या नाटकातील मुख्य पात्राच्या तोंडी असलेले काही dialogue आहे .श्रीराम लागू यांची नटसम्राट मधली मुख्य भूमिका खूप गाजली आणि त्यांच्या तोंडी असलेले स्वगत म्हणजेच monologue खूप गाजले . मधल्या काळात नटसम्राट हा चित्रपट येऊन गेला त्यात मुख्य भूमिका नाना पाटेकर यांनी केली .
to be or not to be हा monologue इथे तुमच्या अभ्यासासाठी share करत आहे .
audition video म्हणून तुम्ही त्याचा वापर करू शकता .
थकवा, वेदना, हतबलता, तडफड, आशा आणि नम्र याचना — या सगळ्या भावना एकामागून एक येतात.
शेवटी, तुफान फक्त एक घरटं मागतं – विसाव्याचं, मायेचं, ओळखीचं.
Natsamrat Dialogue:

अप्पा :
To be or not to be that is the question..
To be or not to be that is the question जगाव की मराव हा एकच सवाल आहे. ह्या दुनियेच्या ऊकिरड्यावर खरकट्या पत्रावळीचा तुकडा होऊन जगाव बेशरम लाचार आनंदान ?
का फेकुन द्याव देहाच लखतर मृत्यूच्या काळाशार डोहामध्ये?
आणि करावा शेवट सर्वांचा एकाच प्रहाराने?
माझा तुझा ह्याचा अन त्याचाही.
मृत्युच्या महासर्पाने जीवनाला असा डंख मारावा…
की नंतर येणा-या निद्रेला नसावा जागृतीचा किनारा कधीही..
पण मग..
पण मग त्या
निद्रेलाही पुन्हा स्वप्न पडु लागलं तर….?
तर…तर…इथेच मेख आहे.नव्या स्वप्नांच्या अनोळखी प्रदेशात प्रवेश करण्याचा धीर होत नाही म्हणुन आम्ही सहन करतो जुन जागेपण..
सहन करतो प्रेताच्या निर्जीवपणाने
अभिमानावर होणारे बलात्कार…
अस्तित्वाच्या गाभा-यात असणा-या सत्वाची विटंबना..
आणि अखेर करुणेचा कटोरा घेऊन उभे राहतो खालच्या मानेन आमच्याच मारेक-यांच्या दाराशी.
विधात्या.. तु इतका कठोर का झालास?
एका बाजुला आम्ही ज्यांना जन्म दिला ते आम्हाला विसरतात आणि दुस-या बाजुला ज्याने आम्हाला जन्म दिला तो तुही आम्हाला विसरतोस.
पण मग विस्कटलेल्या हाडांचे
हे सापळे घेऊन हे करुणाकरा…
आम्ही थेरड्यांनी कोणाच्या पायावर डोक आदळायच? कोणाच्या पायावर ?
कोणाच्या ? कोणाच्या???
कुणी घर देता का घर ?
कुणी घर देता का घर ?
एका तुफानाला कुणी घर देता का ?
एक तुफान भिंतीवाचून, छपरावाचून,
माणसाच्या मायेवाचून, देवाच्या दयेवाचून
जंगलाजंगलात हिंडतय.
जिथूनकुणी उठवणार नाही
अशी एक जागा धुंडतय –
कुणी घर देता का घर ?
खरंच सांगतो, बाबांनो,
तुफान आता थकून गेलंय
झाडाझुडपात डोंगरदऱ्यात
अर्धअधिक तुटून गेलंय
समुद्राच्या लाटांवरती
वणव्याच्या जाळावरती
झेप झुंजा घेऊन घेऊन
तुफान आता खचलं आहे
जळके तुटके पंख पालवीत
खुरडत खुरडत उडतं आहे
खरं सांगतो बाबांनो,
तुफानाला तुफानपणच
नडतं आहे –
कुणी घर देता का घर !
तुफानाला महाल नको
राजवाड्याचा सेट नको
पदवी नको हार नको
थैलीमधली भेट नको
एक हवं लहान घर
पंख मिटून पडण्यासाठी
एक हवी आरामखुर्ची
तुफानाला बसण्यासाठी
आणि विसरू नका बाबांनो,
एक तुळशीवृंदावन हवं
मागच्या अंगणात सरकारसाठी !
सरकार – (रडू लागतो.)
सरकार –
सरकार