( दिलेला मोनोलोग हा “कौंतेय“ या गाजलेल्या नाटकातील कुंतीच्या तोंडी असलेला उतारा आहे )
Character : Female | Age (20-30) | Language: Historical Marathi
कुंती :
स्त्रियांच्या डोळ्यांनी या रक्तपाताकडे पाहिल्याशिवाय त्याची भीषणता तुम्हाला कळून यायची नाही… आईच्या डोळ्यांनी, पत्नीच्या डोळ्यांनी या रक्तपाताकडे जर तुम्ही क्षणभर पाहू शकाल, तर तुमच्या हातातील हत्यारं जमिनीवर निखळून पडतील…
तुम्ही आपल्या दांडगेपणान आणि रक्त लालसेन या नंदनवनाचा नरक करून ठेवला आहे एवढं खरं… नरक, निव्वळ नरक केला आहे… विश्वाच्या पसार्यात किडे कीटकांपेक्षा अधिक महत्त्व नसलेली माणसं तुम्ही, केवढ्या अहंकारान तुम्ही या लढाया लढवीत बसता…
परमेश्वराने हे सुंदर जग निर्माण केलं ते काय माणसाच्या वैरान अन रक्तानं डागाळण्यासाठी?, माणसाला बुद्धी मिळाली ती काय परस्परांचे गळे चीरण्यासाठी ?, आपलं मंदिर प्रकाशित करण्यासाठी देवानं माणसाच्या हातात हा दिवा दिला, आणि त्यांना करंटेपणान मंदिराला आग लावण्यासाठी मात्र त्याचा उपयोग केला…
करंटी करंटी आहे ही माणसाची जात.
For reference, you can watch my monologue ‘
कौंतेय‘ हे वि. वा. शिरवाडकर यांचं नाटक प्रत्येक कलाकाराने वाचलंच पाहिजे.