Character : Male | Age : 20 to 25 | Language : Gramin Marathi
पात्रा विषयी : लढाऊ वृत्तीचा कॉलेजचा मुलगा
पंढरी :
आपण काय पापाने नाहलो नाय… मग मूग गिळून का बसायचं… बोलायची भीती त्यायला असती, ज्यांनी वतनाशी बेइमानी केली, तुम्ही तर तोंडात घास घातले लोकांयच्या… भुईला इकान त संपून जासाल.
ढेकळा सारखं इतळून टाकायले हे लोक आपल्याला… आमी कष्टीलेल्या जमिनीवर हे यांच्या पापांचे बंगले बांधणार… पहिल्यापासून कुनी बी तुम्हाला लुटीत आलं…कुनबीका बेटा जितना पिटा उतना मिटा…
मातीला जपणारे मातीतच गाडण्याचा सैतानी खेळ चालिवलाय यांनी… जमीन विकून पैसे देतात, पर उद्याचं काय ? घर ना दार, चावडी बिऱ्हाड होईन .
Dr. Babasaheb Ambedkar kalam varti Marathi audition script havi aahe