Marathi Audition Script (Monologue) For Male… मराठी मोनोलॉग स्क्रिप्ट ऑडिशनसाठी -3

Marathi Audition Script (Monologue) For Male… मराठी मोनोलॉग स्क्रिप्ट ऑडिशनसाठी

Character : Male | Age : २०-३० | Language : Marathi (praman)

शेखर

जा  जा  जा…   ते हार लवकर घेऊन जा.  ये बाबा इतका वेळ लावलास ना तर त्यांच्या लग्नाच्या पन्नासाव्या anniversary  ला पोहोचशील.  असे हार घालतील ते… ( म्हाताऱ्या कपलची  नक्कल करतो.  खुश होतो.  हसतो )  पळ  पळ  लवकर. 

मी ना एक  छोटीशी इव्हेंट  मॅनेजमेंट कंपनी सुरू केलीये.  पहिलाच इव्हेंट  आलाय तो ही महाराष्ट्राच्या गृहमंत्र्याच्या मुलाच्या लग्नाचा.  इतका परफेक्ट करणार आहे ना मी…  बघालच  तुम्ही.  मॅनेजमेंट स्टडीज चा गोल्ड मेडलिस्ट आहे मी…  अर्थात याचं मला कौतुक नाहीये फार.  success is not what you achieve , it is about how you achieve !  पटलं ? आज नाही पटलं तर उद्या पटेल.  माझी एक successful  फर्म उभी राहिली ना तेव्हा नक्कीच पटेल.  हो…

( इमोशनल होतो ) माझं स्वप्न आहे.  माझ्या फर्म ला बाबांच नाव देणार आहे मी.  त्यांनी एवढ्या खस्ता खाल्ल्या नसत्या  तर मी आज कुणीतरी वेगळाच असतो.  काय माहित  एवढं UK ला वगैरे शिकायला तरी जाता आलं असतं की नाही ते. ( एकदम उत्साहात ) जर त्यांनी इतकं केलं तर आपना  तो काम बनता है ना बॉस…  और मैं ये करके रहूंगा… (  गाणं गुणगुणत जातो ) 

Leave a Reply