व्हाया सावरगाव खुर्द … Via Savargaon Khurd Marathi Natak

दहा पात्रांचा कोलाज

दिनकर दाभाडे लिखित व्हाया सावरगाव खुर्द या कादंबरीवर लिहिलेलं हे नाटक 2023 ला प्रायोगिक रंगभूमीवर आलं.

अस्सल वऱ्हाडी बोली भाषेतलं आणि वऱ्हाडी मातीतलं हे नाटक आहे.

नाटकाला प्रमुख असे कथासूत्र नसले तरी ग्रामपंचायतची निवडणूक हा या नाटकाचा प्लॉट आहे.गावातील नऊ पात्र,ग्रामपंचायतची निवडणूक आणि राजकारण या धाग्याने  बांधले गेले आहे.

गाव म्हटलं की सुंदर,चांगलं – चांगलं, गुण्यागोविंदानं राहणारे लोक असे चित्र डोळ्यासमोर येते,पण गावातील बदलत चाललेलं चित्र, राजकारण, कौटुंबिक कलह, स्त्री पुरुष संबंध,जातीव्यवस्था, मोह, मत्सर, हेवेदावे हे या नाटकात अतिशय नैसर्गिक आणि वास्तविक पद्धतीने मांडले आहे. काही ठिकाणी गमतीशीरपणे  राजकारणावर ओरखडे ओढले आहेत तर पुरुषांनी स्त्रियांना दुय्यम स्थान आणि वागणूक कशी दिली याबद्दल  स्त्रियांनी त्यांची परखड मतं मांडली आहे.

सावरगाव खुर्द या गावातील माणसं तुम्हाला त्यांच्या गावात घेऊन जातात आणि त्यांचं गाव जवळून बघण्याचा एक नाट्यानुभव तुम्हाला देतात. त्यांच्या मनातलं आतलं खोलवरच सगळं ते बिनधास्त तुमच्याशी बोलतात. जे प्रत्येकाला वाटत असतं पण बोलण्याची हिम्मत मात्र होत नाही असं सगळं ही पात्र स्वतःशी आणि प्रेक्षकांशी बोलतात.

Stand-up comedy च्या form मधे उभं केलेलं व्हाया सावरगाव खुर्द, या नाटकात नाट्य घडत नसले तरी प्रेक्षकांना नाट्यानुभव देण्यात हे नाटक कुठेच कमी पडत नाही. शहरी कपड्यांमधील actor तुम्हाला सावरगावातील पात्र म्हणून भेटतात कधी पोट दुखेपर्यंत हसवतात तर कधी तुमच्या अंगावर काटा येईल, तुमच्या डोक्याला झिनझिन्या येईल असेही बोलतात.

नाटकाच्या मधे येणारी गाणी, त्याच्यातील भाषा ही अस्सल वऱ्हाडी अनुभव देतात आणि अभिनय म्हणजे अभिनय नाहीच खरा तर; ही या नाटकाची जमेची बाजू आहे.

 ऑडिशन वीडियो रिकॉर्ड कैसे करें एक्सपर्ट टिप्स…How To Record Audition Video

आसक्त प्रस्तुत
दिनकर दाभाडे यांच्या कादंबरीवर आधारित

व्हाया सावरगाव खुर्द

दिग्दर्शक: सुयोग देशपांडे
निर्मिती: आसक्त कलामंच, पुणे

कलाकार: अभिषेक इंगोले, आनंद डांगरे, अतुल जैन, गिरीजा पातुरकर, इंद्रजीत मोपारी, मृणाल टोपले, मुक्ता कदम, रुपाली गोडंबे/शीतल राऊत, स्वप्नील नवले

गाणी: अश्रुबा अंभोरे, गोविंद गायकी, अवंती लाटणकर
वेशभूषा: देविका काळे
प्रकाशयोजना: सचिन लेले
प्रकाशयोजना सहाय्य: यश पोतनीस
नेपथ्य: रवी पाटील
निर्मिती व्यवस्थापक: अभिनव जेऊरकर
रंगमंच व्यवस्था: आयुष बाफना, संजय पालवे, तनिष्क शेलारे
सुलेखन: रमेश इंगळे उत्रादकर
पोस्टर डिझाइन: मुक्ता कदम, पायल पाटील
जाहिरात: कौस्तुभ हिंगणे
प्रसिध्दी छायाचित्रे: स्वप्निल पंडित
विशेष आभार: नुपूर दाभाडे पाटील, वीणा दाभाडे कराळे, हेमंत दिवटे, पेपरवॉल मीडिया आणि प्रकाशन, डॉ. पी.आर.राजपूत, रवींद्र इंगळे चावरेकर, स्नेहल नागदिवे, शुभांगी दामले
तालीम हॉल: इन्क्युबेटर, सुदर्शन रंगमंच, ज्योत्सना भोळे सभागृह

एकदा नक्की हे नाटक बघा.

Leave a Reply