पिंजर कादंबरी.. Pinjar (The Skeleton and That Man)Novel by Amrita Pritam!

पिंजर कादंबरी
अमृता प्रीतम हे नाव आपना सर्वांच्या परिचयाचे आहेच. साहित्य अकादमी मिळवणाऱ्या त्या पहिल्या भारतीय महिला. त्यांच्या नावावर अनेक पुरस्कार आहेत, तसेच त्यांची अनेक पुस्तके ,लेख ,कथासंग्रह आणि कवितासंग्रह प्रसिद्ध आहे. त्यांनी लिहिलेल्या एका अशाच उत्कृष्ट आणि गाजलेल्या पुस्तकाविषयी आपण आज वाचणार आहोत. चला तर मग..


अमृता प्रीतम यांनी लिहिलेली पिंजर ( Pinjar The Skeleton and That Man Novel by Amrita Pritam!) हि पंजाबी ढंगाची उर्दू हिंदी मिश्रित कादंबरी त्याचा मराठी अनुवाद केलाय डॉ. राजेश्री यांनी.
मूळ लेखिका – अमृता प्रीतम
मराठी अनुवाद – डॉ.राजेश्री
प्रकाशक – विजय प्रकाशन नागपूर
पृष्ठ संख्या – ९४
मुखपृष्ठ – विवेक रानडे
मुखपृष्ठ अतिशय अर्थपूर्ण आणि सूचक आहे. एक सापळा म्हणजेच पिंजरा.

पुस्तकाचा काळ आहे १९३५ ते १९४७ म्हणजेच स्वातंत्र्यपूर्व, भारत पाकिस्तान फाळणी दरम्यानचा काळ.
पिंजर या पुस्तकातील कथेची नायिका आहे पुरो .
पुरो हि एक हिंदू मुलगी आहे.तीच लग्न ठरलंय आणि ती आपल्या संसाराची स्वप्न रंगवत असते,पण अचानक एक मुस्लिम मुलगा सूडाच्या भावनेने तिचं अपहरण करतो. इथूनच मूळ कादंबरीची सुरुवात होते. भारत -पाकिस्तान फाळणी दरम्यानचा काळ. धार्मिक, राजकीय, सामाजिक संघर्ष आणि त्यात पुरोचा भावनिक संघर्ष .तिचं एकीकडे अडकलेलं मन आणि एकीकडे अडकलेला देह. अस्तित्वाचा स्वीकार आणि तिच्या अस्तित्वाची तिच्या मनाशी चाललेली लढाई. त्या मानसीक अवस्थेतही तिचं माणूसपण जागं असतं.

वेगवेगळी वळणं घेत कादंबरी पुढे पुढे सरकत जाते . वेगवेगळ्या घटना त्या घटनांचा वेगवेगळ्या व्यक्तीशी, वेगवेगळ्या ठिकाणांशी असलेला संबंध यातून वाचनाची ओढ वाढत जाते. कादंबरीचा शेवटही तितकाच वास्तवदर्शी आहे .
सुडाची भावना, स्त्रियांचं शोषण ,प्रेमाची आदिम भावना ,धार्मिक चढाओढ आणि समकालीन सामाजिक, राजकीय परिस्थितीच चित्रण लेखिकेने उत्कृष्ठरित्या मांडलं आहे .

हि कादंबरी इतकी गाजली होती कि या कादंबरीवर आधारित २००३ साली पिंजर नावाचा हिंदी चित्रपट आला.स्टारकास्ट होती उर्मिला मातोंडकर आणि मनोज बाजपेयी हे मुख्य भूमिकेत होते .
या चित्रपटाला national award पासून ते अनेक पुरस्कार मिळाले होते. कथा अमृता प्रीतम आणि दिग्दर्शक होते चंद्रप्रकाश द्विवेदी .


मित्रांनो मी हि कादंबरी २ दिवसात वाचली तुम्हीही लगेच वाचायला घ्या आणि comment करून प्रतिक्रिया कळवा .

Leave a Reply